Monday, May 4, 2026
Homeनागपूरबारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण..

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सहा दिवसांपूर्वी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याने घरीच गळफास लावून आत्महत्या केली होती; मात्र,त्याने कशामुळे आत्महत्या केली हे कळलेले नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली.त्यानुसार,आता विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.यश ज्ञानेश्वर ढोक वय १७ वर्षे, रा.
मनसर,ता.रामटेक या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याने मंगळवारी १० डिसेंबरच्या दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरीच गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.मृत यश ढोक हा सेक्सटॉर्शनचा बळी ठरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेच्या दिवशी यशच्या मोबाइल फोनवर तरुणीच्या नावाने चार तासांमध्ये किमान २० मॅसेज आले होते. त्या तरुणीने यशला त्याचे विवस्र अवस्थेतील फोटो त्याच्या कुटुंबीयांना पाठविण्याची मॅसेजमधून धमकी दिली होती.यासाठी ती त्याला पैशाची मागणी करीत होती.सुरुवातीला यशने तिला फोन पे द्वारे ४,५०० रुपये पाठविले होते.ती त्याला वारंवार पैशाची मागणी करीत त्याची बदनामी करण्याची धमकी देत असल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले,असेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.त्याचा मोबाइल फोन रामटेक पोलिसांच्या ताब्यात असून,यशला प्राप्त झालेले मॅसेजचा मोबाइल क्रमांक सध्या झारखंड येथे कार्यरत असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
यश घोटी (टोक),ता.रामटेक,जि.नागपूर येथील शाळेत इयत्ता बारावीत शिकायचा.त्याचे वडील ज्ञानेश्वर ढोक हे भाजपचे पदाधिकारी असून,आई अंगणवाडी सेविका आहे.तो आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता.तो मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शिकवणी वर्ग आटोपून घरी परत आला होता.त्यावेळी आई अंगणवाडीत व वडील शेतात गेले असल्याने तो घरी एकटाच होता.आई दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरी परतल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे तिच्या निदर्शनास आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!