Wednesday, April 15, 2026
Homeभंडारावडिलांनी मोबाइल खरेदीसाठी पैसे न दिल्याने २६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली...

वडिलांनी मोबाइल खरेदीसाठी पैसे न दिल्याने २६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कोच्छी येथील एका २६ वर्षीय तरुणाने वडिलांनी मोबाइल खरेदीसाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १४ एप्रिलला घडली.विवेक नागरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
विवेक हा वडिलांना मोबाईल खरेदीसाठी पैसे मागत होता.मात्र,वडिलांनी कर्जाची रक्कम बचत गट तसेच इतर संस्था यांच्या कडून घेतली होती.अगोदर उचल केलेल्या कर्जाची परतफेड करावयाची असल्याने त्यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु विवेक हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.त्यातच घटनेच्या दोन दिवसांपूर्वी त्याने अती दारू प्यायला.त्यामुळे तो गावालगतच्या जंगल परिसरातील रस्त्यावर झोपलेला दिसून आला होता.कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला घरी नेले.अशातच १४ एप्रिल रोजी विवेकने वडिलांना मोबाइलसाठी पैसे मागितले होते.वडिलांनी नकार दिल्याने दुपारच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने रागाच्या भरात घरीच नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.कुटुंबीय घरी परतल्याने विवेक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!