Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयात परमानंट सुरक्षा रक्षक भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद... - आणखी चार...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात परमानंट सुरक्षा रक्षक भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद… – आणखी चार दिवस चालणार भरती प्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मानांकन तथा भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा.लि.डिपार्टमेंट आणि देसाईगंज नूतन शिक्षण प्रसारक मंडळ आदर्श कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने  १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत सुरक्षा रक्षक, सुपरवाइझर भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
 काल,मंगळवार १५ एप्रिल पासून सुरू झालेल्या भरतीस बेरोजगार युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ज्या तरूणांनी सहभाग घेतला त्यांना प्रशिक्षण आणि ६० वर्षा पर्यन्त कायमस्वरुपी नोकरीसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले.ज्या युवकांची नोकरीसाठी निवड झाली,त्यांना महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा.डॉ.श्रीराम गहाणे आणि रोजगार मार्गदर्शक प्रमुख प्रा.निहार बोदेले तसेच एस.एस. सिक्युरिटी डिपार्टमेंटचे भरती अधिकारी महेश सरतापे यांच्या हस्ते जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले .
भरती झालेल्या युवकांना परमनंट नोकरी दिली जाणार आहे.त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा मेडिकल,ग्रॅजुटी,पी एफ पेन्शन,विधवा पेन्शन,अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र किमान मजुरी वेतन नियमाप्रमाणे वेतन मिळणार आहे.ज्यात १५ हजार ते २३ हजार पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील.सदरची भरती प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू झाली असून १९ एप्रिल २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत देसाईगंज आदर्श कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे  सुरू राहणार आहे.तरी १९ एप्रिल पर्यंत या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी  लाभ घ्यावा,जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया बंद केली जाईल,असे आवाहन भरती अधिकारी महेश सरतापे आणि  राजरत्न निकाळजे  यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क :- 9552238057, 9569721640
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!