Sunday, April 26, 2026
Homeमुंबईलोकशाहीचे मंदिर असलेल्या विधिमंडळ परिसरात फ्री स्टाईल हाणामारी..

लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधिमंडळ परिसरात फ्री स्टाईल हाणामारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधिमंडळ परिसरात अतिशय धक्कादायक तितकीच लांच्छनास्पद घटना आज,गुरुवार १७ जुलै रोजी घडली.काल बुधवारी विधानभवनाच्या बाहेर गेटवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट)जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता.वाद इतक्या टोकाला गेला होता की,गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती.विधिमंडळाचे मुंबईत सुरू असलेले पावसाळी अधिवेशन उद्या,शुक्रवार १८ जुलै रोजी संपणार आहे.विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी आज गुरुवारी सभागृहात मांडला.त्यामध्ये त्यांनी काल बुधवारी झालेला वाद,त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली.यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या परिसरात आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला.गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला.यांच्यामध्ये कालच वाद झाला होता.हे प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत गेले होते.अश्यातच आज गुरुवारी यानंतर दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली.दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना यथेच्छ शिवीगाळ केली.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेले. विधान भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे घडलेल्या घटनेने संदर्भात अहवाल सादर केलेला आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आमदारांसोबत केवळ शासकीय स्वीय सहाय्यकाला परवानगी आहे.पण तरीही आमदार मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत आणतात. विधानसभा सदस्य असलेल्या आमदारांकडून नियमांची पायमल्ली केली जाते,असे पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे. सर्वपक्षीय आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विधिमंडळात येतात.बऱ्याचदा आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे पासही नसतात.परवाना नसतांना ते अनेक ठिकाणी फिरत असतात.विधिमंडळात त्यांचा अगदी मुक्त संचार असतो.आमदारांच्या कार्यकर्त्यांचे विधिमंडळात फोटोसेशन चालते,अशा महत्त्वाच्या बाबी पोलिसांनी त्यांच्या अहवालात नमूद केल्या आहेत.आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ट्रॅक्टरमध्ये रेती भरून रेतीची साठवणूक करण्यासाठी भरधाव वेगात निघालेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या...

पहिल्यांदा वाघिणीचा हल्ला; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी.. – अन् काही वेळातच ‘टी-८४’ वाघिणीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज,रविवार २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शेतशिवारात भटकंती करणाऱ्या...

दोन बहिणींच्या बँक खात्यावर ठेवले स्वतःचे नियंत्रण अन् तब्बल ४८ लाखावर मारला डल्ला.! – ठगबाज निघाला कुरखेडा तालुक्यातील..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका ठगबाजाने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन बहिणींची तब्बल ४८ लाखाहून अधिकच्या रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली शहरात उघडकीस आला...

उद्यापासून कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर..

उद्रेक न्युज वृत्त :-अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि कृषी केंद्र चालकांची होणारी कुचंबणा याविरोधात राज्यातील कृषी केंद्र चालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!