उद्रेक न्युज वृत्त :-जनसुरक्षा विधेयकावर १२ हजार आक्षेप आले होते.या संदर्भात विरोधकांनी लेखी स्वरुपात त्यांचे मत मांडले होते.पण,सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर दोन्ही सभागृहात विरोधकांचा आवाज दाबून टाकला.मी सभागृहात नाही हे बघूनच सरकारने जनसुरक्षा विधेयक सभागृहात आणले आणि मंजूर करुन घेतल्याचे विजय वडेट्टीवारांनी आज, गुरुवार १७ जुलै रोजी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींश बोलतांना सांगितले. विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर झाले त्यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार सभागृहात नव्हते.या गैरहजेरीप्रकरणी वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.त्यामुळे प्रसारमाध्यमांनी याबाबत वडेट्टीवारांना विचारले असता,मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले.सभागृहात असतो तर विधेयकाचे कागद तिथेच फाडून टाकले असते असे विजय वडेट्टीवार म्हणाले.शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.उद्योगपतींविरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत.ही आंदोलने दडपण्यासाठीच सरकारने जनसुरक्षा विधेयक सादर केल्याचा आरोप त्यांनी केला.
मी सभागृहात नाही हे बघूनच सरकारने जनसुरक्षा विधेयक सभागृहात आणले- विजय वडेट्टीवार
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

