Friday, October 16, 2026
Homeपरभणी'ते' दोघेही निघाले प्रेमी; नवजात अर्भक ट्रॅव्हल्समधून बाहेर फेकल्याचे प्रकरण..

‘ते’ दोघेही निघाले प्रेमी; नवजात अर्भक ट्रॅव्हल्समधून बाहेर फेकल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
परभणी :-पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या ‘संत प्रयाग’ नामक खासगी ट्रॅव्हल्समध्ये काळीज हेलावणारी घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार १५ जुलै रोजी सकाळच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी ते सेलू मार्गावरील देवनांदरा शिवारात घडली होती.धावत्या ट्रॅव्हल्समध्ये महिलेची प्रसूती झाली आणि नवजात अर्भकास ट्रॅव्हल्समधूनच बाहेर फेकण्यात येत असतांनाच सदरची बाब ही इतर प्रवाशांच्या लक्षात आली आणि याबाबत पाथरी पोलिसांना माहिती दिली होती.पोलिसांनी घटनास्थळावरून नवजात अर्भक ताब्यात घेत तपास केला असता नवजात अर्भक बालक (पुल्लिंग) असल्याचे निष्पन्न झाले होते.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्सचा शोध घेत परभणीमध्ये बस थांबवून प्रवाशांची कसून चौकशी केली आणि एका महिलेसह पुरुषाला ताब्यात घेतले होते.तपासाअंती संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत होते.अश्यातच आता ते दोघेही प्रियकर व प्रेयसी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.१९ वर्षीय रितिका ढेरे व २१ वर्षीय अल्ताफ शेख अशी दोघांची नावे असून बाळाचा जन्म होताच घाबरलेल्या अल्ताफनेच बालकास ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून बाहेर फेकले होते.यात त्याचा मृत्यू झाला होता.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, थोरे,वाघ,कदम यांच्या पथकाने केली होती.आता पाथरी पोलिसांनी प्रियकर व प्रेयसी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!