Friday, October 16, 2026
Homeपरभणीपोलिस शिपायाचा पोलिस मुख्यालयातच खून..!

पोलिस शिपायाचा पोलिस मुख्यालयातच खून..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

परभणी : पोलीस मुख्यालयातील क्वार्टरमध्येच निलंबित पोलीस शिपायाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली आहे.पोलिसांच्या क्वार्टरमध्ये जर खून होत असले तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का,असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.गजानन शिवाजी पाटील (वय ३६, वर्ष) असे खून झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.या घटनेमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,परभणी पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या गजानन शिवाजी पाटील या पोलीस शिपायाचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालय या ठिकाणी करण्यात आली होती.ते २५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास परभणी येथील पोलीस मुख्यालयातील कॉर्टरमध्ये असताना त्यांच्या डोक्यामध्ये आणि छातीवर मारून अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृत गजानन पाटील यांचा मृतदेह परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी दुसऱ्या दिवशी पोलीस कर्मचारी तुळशीदास देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परभणी पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.तर पोलीस मुख्यालयामध्येच पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला असल्याने सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!