Saturday, September 5, 2026
Homeनवी दिल्लीलालकृष्ण अडवाणी  ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित….

लालकृष्ण अडवाणी  ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज,रविवारी दिनांक- ३१ मार्च रोजी ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,गृहमंत्री अमित शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते.त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे संस्थापक सदस्य नानाजी देशमुख यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते भाजप आणि आरएसएसशी संबंधित असलेले तिसरे नेते आहेत.राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात चार दिग्गजांना मरणोत्तर भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह,माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि कृषी क्षेत्रातील संशोधक एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!