उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे तेरावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २९ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात मुडझा येथील ज्येष्ठ कवी वामनदादा गेडाम यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “धुडकावणे व्यथेला” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
वामनदादा गेडाम हे मुडझा (जि.गडचिरोली) येथील ज्येष्ठ कवी व प्रसिद्ध कव्वाल म्हणून परिचित आहेत. अनेक गझल आणि कवितांचे लेखन त्यांनी केलेले असून नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रानगर्भ फुलत आहे ‘ या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून विविध स्तरावरुन त्यांचा गझलकार व कव्वाल म्हणून सत्कार झालेला आहे. ते सातत्याने कविता व गझल लेखनाचे कार्य करीत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या तेराव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संतोष कपाले, मुर्लीधर खोटेले,सुनील मंगर,तुळशीराम उंदीरवाडे, गणेश रामदास निकम,चरणदास वैरागडे,विलास जेंगठे,जयराम घोंगडे, वसंत चापले, प्रेमिला अलोने,सुजाता अवचट,पी.डी.काटकर,रेखा दिक्षित, उपेंद्र रोहनकर,हरिष नैताम, वामनदादा गेडाम,संगीता रामटेके, नरेंद्र गुंडेली,मनोहर दुधबावरे,गजानन गेडाम, मारोती आरेवार,मिलींद खोब्रागडे,प्रशांत गणवीर, पुरुषोत्तम दहिकर,प्रतिभा सुर्याराव,पुरुषोत्तम लेनगुरे, ज्योत्स्ना बन्सोड,वंदना मडावी,संजय बन्सल इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

