- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वकांक्षी आणि महायुती सरकारसाठी लाभदायी योजना ठरली आहे. लाडकी बहीण योजना विधासभा निवडणुकीसाठी गेमचेंजर म्हणून मानली जात आहे.सुरुवातीला या योजनेचा लाभ सर्वच स्तरातील महिलांनी घेतला.नंतर शासनाच्या वतीने काही शर्ती,अटी व निकष लादले.अश्यातही दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ तसेच निकषात बसत नसलेल्या लाभ घेतांना शासनाच्या निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे.या अंतर्गत लाभार्थी महिला या योजनेचे निकष पूर्ण करतात का? याची घरोघरी जाऊन छाननी केली जात आहे. त्यामुळे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थी महिलांना या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तब्बल २ कोटी ५९ लाख लाभार्थी आहेत.त्यांना दरमहा ३ हजार ८८५ कोटी रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीतून दिली जात आहे.या योजनेतील हजारो महिलांना सरकारच्या इतरही योजनांचा लाभ मिळत आहे.यात संजय गांधी निराधार योजना व नमो शक्ती योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश आहे.पण आता या दोन्ही योजनांसह स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारणाऱ्या महिलांचा आकडा ५ लाख ४० हजारांपर्यंत पोहोचला आहे.महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती.या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.यामुळे अनेक निराधार महिलांना हक्काची मदत मिळाली आहे.पण यात अनेक खोटे लाभार्थीही आढळून येत आहेत.या पार्श्वभूमीवर सरकारने या योजनेतील पडताळणी सुरू केली आहे.या अंतर्गत पात्र महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे का? किंवा त्या या योजनेतील पूर्ण निकष पूर्ण करतात का? याची पडताळणी केली जाणार आहे.यामुळे ही पडताळणी पूर्ण होईपर्यंत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही,असे सांगितले जात आहे.या प्रकारामुळे महिला वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -

