Friday, July 31, 2026
Homeगोंदियाअल्पवयीन मुलीचे विनयभंग करून वर्षभरापासून फरार आरोपी अटकेत..

अल्पवयीन मुलीचे विनयभंग करून वर्षभरापासून फरार आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-अल्पवयीन मुलीचे विनयभंग करून मागील एक वर्षापासून सराईत गुन्हेगार असलेल्या फरार आरोपीच्या रावणवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सतीश जयलाल ठाकरे वय ४५ वर्षे,रा.बनाथर ता.गोंदिया असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्रकरण असे की,आरोपी सतीश ठाकरे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी ९ जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता.घटना घडताच सतीश ठाकरे घटनेच्या दिवसापासून पळून गेला होता.त्याने शक्कल लढवून स्वतःजवळ मोबाईल न ठेवता इतरत्र भटकत होता.त्यातच त्याचा ठाव ठिकाणा कुणालाही माहीत नसल्याने पोलिसांपुढे त्याचे शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे होते.अशातच आरोपी सतीश ठाकरे याच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल होते.सराईत गुन्हेगार असलेल्या सतीश बाबत इतर पोलीस ठाण्यात फरार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली.पोलिसांना वारंवार चकमा देत असतांना त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.वर्षभरापासून फरार असल्याने आरोपी हा रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.पोलिस हवालदार अरविंद चौधरी व पोलिस पथकाने ताबडतोब शोधकार्य अवलंबिले आणि आरोपीला रजेगाव परिसरातून ताब्यात घेत अटक केली.आरोपी सतीश ठाकरे याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यानुसार,त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रावणवाडीचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे,सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे,पोलिस हवालदार अरविंद चौधरी,पोलिस शिपाई आशीष वैद्य यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!