Wednesday, June 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींच्या नावावर लाभ घेणाऱ्यांकडून ११ महिन्यांची रक्कम होणार वसूल..!

लाडक्या बहिणींच्या नावावर लाभ घेणाऱ्यांकडून ११ महिन्यांची रक्कम होणार वसूल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्यास दीड हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा होताच राज्यातील महिलांनी धावत -पळत सुटून योजनेचे अर्ज भरले.अश्यातच काही महिलांकडे बँकेचे खाते नसल्याने अश्यांनी कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या खात्यांची माहिती भरली होती. त्यामुळे बऱ्याच पुरुषांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम झाली.त्यातच राज्यातील एकूण १४ हजार २९८ पुरुषांनी महिलांच्या नावावरून लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे आता सरकार ॲक्शन मोडवर आले असून येत्या १५ दिवसांत संबंधितांकडून तब्बल ११ महिन्यांचे १६ हजार ५०० रुपये वसूल करणार असून आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.राज्यातील अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळाला.मात्र,सरकारने केलेल्या पडताळणी अंती तब्बल २६ लाख ३४ हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले. याचीही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून पात्र व अपात्र याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!