Tuesday, July 7, 2026
Homeगोंदियालग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेली 'ती' परतलीच नाही; १८ वर्ष व्हायला अवघे १५...

लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेली ‘ती’ परतलीच नाही; १८ वर्ष व्हायला अवघे १५ दिवस होते बाकी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-पाच दिवसांपूर्वी घरा शेजारी असलेल्या एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी अजूनपर्यंत घरी परतली नसल्याने कुटुंबीयांना मुलीची चिंता सतावत आहे.विशेष म्हणजे,मुलगी केवळ १७ वर्षे ११ महिने १५ दिवसांची असून तिने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.बेपत्ता मुलगी गोरी,५ फूट उंचीला,सडपातळ बांधा,अंगात हिरव्या रंगाची कुर्ती व काळ्या रंगाची लेगिज,केस काळे व लांब,कानात टॉप्स परिधान केली असून १६ मे बेपत्ता झालेल्या मुलीचा १७ मे पर्यंत  कोणताही ठावठिकाणा लागला नाही.त्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदरची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील तिरखेडी गावात उघडकीस आली असून पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!