- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-घरकुल बांधकाम मजुरांची हजेरी तयार करून पाठवण्यासाठी घरकुल लाभार्थ्यास १ हजार ६०० रुपये मागून १ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगारसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडुन बुधवारी अटक केली आहे.गोंदिया तालुक्याच्या रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम झिलमिली येथे कारवाई करण्यात आली.खुमेश भोजराज वघारे वय २७ वर्षे,ग्रामपंचायत झिलमिली असे लाचखोर रोजगारसेवकाचे आहे. नाव
सिंदीटोला येथील ५७ वर्षीय तक्रारदारास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वर्ष २०२४ मधे घरकुल मंजूर झाले.सप्टेंबर २०२४ मध्ये पहिला हप्ता १५ हजार रुपये व २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरा हप्ता ७० हजार रुपयांचा तक्रारदारांच्या पोस्टामधील खात्यात जमा झाले.त्यानंतर तक्रारदारांनी रोजगार सेवक खुमेश वधारे याला घरकुल बांधकामाचे काम करणाऱ्या मजुरांची हजेरी (मस्टर) तयार करून पाठवण्याची विनंती केली.यावर वधारे याने मस्टर तयार करून पाठवून देण्यासाठी एक हजार ६०० रुपयांची मागणी केली.यावर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता वधारे याने तडजोडीअंती पंचासमक्ष एक हजार २०० रुपयांची लाचेची मागणी केली.दरम्यान, पथकाने सापळा लावून वधारे याला त्याच्या घरीच तक्रारदाराकडून एक हजार २०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार,सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,हवालदार संजय बोहरे,मंगेश काहालकर,पोलीस शिपाई संतोष शेंडे,संतोष बोपचे, अशोक कापसे,प्रशांत सोनेवाने,कैलास काटकर, महिला शिपाई संगीता पटले,रोहिणी डांगे,चालक शिपाई अल्फाज शेख यांनी पार पाडली.
- Advertisement -

