Thursday, July 16, 2026
Homeगोंदियारेती माफियांचा नवा फंडा; थेट कंटेनर वाहनातून रेती तस्करी..

रेती माफियांचा नवा फंडा; थेट कंटेनर वाहनातून रेती तस्करी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-कोणत्याही विभागाचा अधिकारी असो वा कर्मचारी,यांनी मनात आणले तर सर्व अवैध कारभार, धंदे व मनमानीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही.पण, हल्ली इमानदारीचा धंदाच राहिलेला नाही.वरचा अधिकारीच अंगाला हळद लावत नसल्याने खालचा कर्मचारी करणार तरी काय?त्यामुळे,जसे चालत आहे ना चालू द्या.! अशी अनेकांची मनधारणा झालेली आहे. अश्यातच गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून,गेल्या काही दिवसांपासून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व टिप्परवर सातत्याने कारवाई केली जात आहे.अश्यातच रेतीमाफियांनी नवा फंडा वापरून ट्रॅक्टर,टिप्परवर कारवाई केली जात असल्याने चक्क कंटेनर वाहनातून रेतीतस्करी करून महसूल प्रशासनास चॅलेंज केलेले असतांनाच तस्करांचा ‘फिल्मी स्टाईल’ ने पाठलाग करीत मुसक्या आवळल्या.सदरचा प्रकार गोंदिया कोहमारा महामार्गावर उघडकीस आला. कारवाईने रेतीतस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गोरेगाव तहसील प्रशासनास एका कंटेनर वाहनातून रेती तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.सदरचा कंटेनर गोंदियाहून कोहमाराकडे निघाला आहे.या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. ताळपत्रीने झाकलेला एमएच ४० सीएम् ९५९९ क्रमांकाचा कंटेनर येताच तहसीलदार प्रज्ञा भोकरे व पथकाने कंटेनर थांबवून तपासणी केली असता अवैध रेती वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ कारवाई करीत कंटेनर ताब्यात घेण्यात आला.सदरची कारवाई तहसीलदार प्रज्ञा भोकरे, पथकातील विलास मोदरकर,पी.वाय.रहांगडाले व आर.बी.राऊत यांनी केली.कंटेनरचा मालक रोहित गुलहानी असून तहसीलदारांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ माजली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!