- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अवैध रेती चोरीसाठी चोरटे नवनवीन तंत्रज्ञान आणि शक्कल लढवीत असल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आला आहे.तुमसर तालुक्यात सध्या रेतीची अवैध वाहतूक होत नसल्याचे भासत असलेतरी नदी तिरावर वसलेल्या ग्रामीण भागात या उलट चित्र पाहावयास मिळते. रेतीची मागणी व पूर्तता यामुळे सध्या शहरी भागातील बांधकामे ठप्प पडली आहेत.होईल त्या मार्गाने, मिळेल त्या दराने रेतीची मागणी पूर्ण करण्याकरिता माफियांना कमालीची शक्कल लढविली आहे.अवैध रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला चक्क तणसाने झाकून वाहतूक केली जात आहे.शहरात एकाएकी वाढलेली ही वाहतूक सामान्य नागरिक सहज अनुभवत आहेत.त्याची चर्चा देखील केली जात आहे. शहरातील अतिव्यस्त भागातून धावणारी ही वाहतूक प्रमुख ३ पोलिस चौकातून होऊन जाते.मात्र,यापासून पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांची तुमसरची टीम व महसूल विभाग अनभिज्ञ कसे? याचेच मोठे आश्चर्य ! महसूल पोलिस विभाग सोबतीला? सध्या परवानाप्त तामसवाडी व सोंडया या डेपोवरून रेतीची रीतसर वाहतूक सुरू आहे.मात्र,या दोन्ही डेपोची वैधता कालावधी नेमकी किती? तसे असलेतरी स्थानिक स्तरावर ट्रॅक्टरने वैध परवाना असलेल्या रेती वाहतुकी व्यतिरिक्त धावणारी अवैध वाहने महसूल व पोलिस विभागाच्याच आशीर्वादाने मार्गी लावली जात असल्याची चर्चा शहरात जोर धरून आहे.
वैध परवाना असलेली रेती ट्रॅक्टरच्या एक ब्रास क्षमतेनुसार १५०० रुपये रेती,गाडी,हमाल,डिझेल भाडा असे सर्व मार्गाने शहरात ५ हजार २०० ते ३०० दराने गरजूला उपलब्ध करून दिली जात आहे.त्यातही तालुक्यातील ठेकेदारांनी कामबंद केल्याचे चित्र आहे.याचाच नेमका फायदा अवैध वाहतूकदार घेत असल्याचे समजून येते.त्यामुळे वैध-अवैध रेती वाहतूकदार देखील गरजूंची लूट करीत असल्याची माहिती आहे.
- Advertisement -

