Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजसक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था व आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीची आढावा बैठक संपन्न...

सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था व आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीची आढावा बैठक संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था व आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीची आढावा बैठक नुकतीच २ ऑक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंजच्या तालुका आरोग्य कार्यालयात  संपन्न झाली.
सदर बैठकीचे अध्यक्ष महेंद्र खरकाटे,प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ.सौंदरकर आरमोरी तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉक्टर ठेंगरी,कृष्णा कदम लसीकरण नियंत्रक,शुभम मदनकर,सुधीर बन्सोड आरोग्य सेवक, कुष्ठांतेय अधिकार मंचाचे सदस्य लतीफ शेख तसेच सक्षम पुस्तके स्वाभिमानी संस्थेचे बोर्ड सदस्य शालूताई दिघोरे,सक्षम पुस्तके स्वाभिमानी संस्थेचे सहनिर्देशक श्रावण हांडेकर, नारायण उरकुडे,विद्याताई कांबळे तसेच २७ कुष्ठांतेय बंधू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन महेंद्र खरकाटे यांच्या हस्ते करण्यात आले व कुष्ठातेयांनी प्रतिमेचे पूजन केले.सर्वप्रथम सक्षम कुष्ठानचे स्वाभिमानी संस्थेची माहिती आणि संस्थेची समोरची वाटचाल तसेच कुष्ठांतेयाचे सक्षमीकरण करण्यासाठी समिती आणि संस्था या विषयाची माहिती श्रावण हांडेकर, नारायण ऊरकुडे व विद्या कांबळे यांनी दिली.प्रसंगी सौंदरकर म्हणाले की,मी अलर्ट इंडिया संस्थेमध्ये काम करीत असतांना सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची स्थापना झाली.मला अभिमान वाटतो की स्वतः कुष्ठांतेयानी कुष्ठातेंयासाठी आपल्या अधिकार हक्कासाठी तयार केलेली संस्था उभी केली.संस्थेमध्ये आजीवन सदस्य बनून संस्थेचे बळकटीकरण व कुष्ठांतेयाचे सक्षमीकरण करून संस्था सर्वांनी मिळून पुढे नेण्याचे काम कुष्ठांतेयानी करावे,तसेच संस्थेच्या माध्यमातून स्वतः उभे राहून शासकीय योजनेचा लाभ मिळावा; यासाठी शासनापुढे मागणी करावी. कुष्ठातेंयाना योजनेचा अनेक प्रकारचा लाभ मिळावा आणि आरोग्य विभागामार्फत ज्या सोयी-सुविधा आहेत,त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू; असे डॉ.सौंदरकर यांनी म्हटले.तसेच सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे सहनिर्देशक श्रावण हांडेकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून व संस्थेची कार्ये याबद्दल माहिती दिली.तसेच नारायण उरकुडे यांनी मी स्वतः कुष्ठांतेय असून आलेली विकृती कशी टाळता येईल, कुष्ठांतेयाना पण समाजात मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे; याबद्दल माहिती दिली.विद्या कांबळे यांनी संस्थेचे आजीवन सदस्य वाढ करण्याकरिता तसेच बचत गट तयार करण्याचे प्रोत्साहन दिले.त्यानंतर आत्मनिर्भर कुष्ठांतेय समिती तालुकाचे अध्यक्ष महेंद्र खरकाटे यांचा वाढदिवस सर्व कुष्ठांतेय बंधू भगिनी यांच्या वतीने साजरा करण्यात आला.नंतर संस्थेची पुढील वाटचाल कशी असणार यावर आढावा बैठक घेण्यात आली.त्यामध्ये विविध कुष्ठांतेयानी बचत गट, आजीवन सदस्य संस्थेचा कार्यभार,कुष्ठांतेयांच्या  समस्या सोडवण्यासाठी तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली.अध्यक्षीय भाषण चर्चेमध्ये आलेल्या विषयाचा, मी स्वतः पुढाकार घेऊन समिती आणि संस्था संपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन,असे अध्यक्ष महेंद्र खरकाटे यांनी म्हटले व आपापल्या गावातील कुष्ठांतेयांना आजीवन सदस्य बनवून आपली संघटना मजबूत करण्यात यावी असे आवाहन  केले.सदर कार्यक्रमाचे आभार विद्या कांबळे यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!