- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे येत्या १ ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सकाळी साडेदहा वाजता मोरवा येथील विमानतळावर आगमन झाल्यावर त्या ठिकाणाहून वन अकादमीकडे प्रयाण करतील.वन अकादमी येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट व चर्चा करणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ वाजता वन अकादमी येथून दुपारी ३ वाजता पोंभुर्णाकडे जात आदिवासी मेळाव्यानिमित्त विविध स्टॉलची पाहणी करीत आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहतील.रात्री वन अकादमी येथे मुक्काम करून २ ऑक्टोबरला सकाळी गडचिरोली येथे प्रयाण करतील.
- Advertisement -

