Monday, July 13, 2026
Homeनागपूरआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह भासरे व सासूविरोधात गुन्हा दाखल...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह भासरे व सासूविरोधात गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भिवापूर(नागपूर):-दोन वर्षांपूर्वी स्वेच्छेने प्रेमविवाह करणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेने आठवडाभरापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली.कारगाव येथे घडलेल्या या आत्महत्या मृत सुचिता खाटीक प्रकरणात पोलिसांनी काल,रविवारी २९ सप्टेंबरला पतीसह भासरे व सासूविरोधात गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे.सुचिता निखिल खाटीक वय २६ वर्षे,रा.कारगाव,ता.भिवापूर असे मृत विवाहितेचे नाव आहे.आरोपींमध्ये पती निखिल दिलीप खाटीक,भासरे शैलेश दिलीप खाटीक व सासू शोभा दिलीप खाटीक, सर्व रा.कारगाव यांचा समावेश असून,पती निखिल व भासरे शैलेश यांना अटक केली आहे.२१ सप्टेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास सुचिताने राहत्या घरी विष प्राशन केले.अत्यवस्थ अवस्थेत तिला नागपूर येथील मेडिकल व रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी २२ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी गावातील नागरिक,मृत सुचिताचे नातेवाइकांचे जबाब नोंदविले.यात मृत सुचिताला कौटुंबिक त्रास होता,तिला वारंवार मारहाण केली जात होती; अशी माहिती समोर आली.तसेच सुचिताचे वडील अरुण विठ्ठल वरखडे रा.सालेशहरी सालेभट्टी (पुनर्वसन) व माहेरच्या मंडळींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे हेड कॉन्स्टेबल मधुकर सुरपाम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती निखिल,भासरे शैलेश व सासू शोभा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम ८५,१०८,३ (५) अन्वये गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास उपनिरीक्षक किरण महागावे करीत आहेत.
पती निखिल व त्याचा भाऊ शैलेश हे कारगाव बसथांब्यावर पानठेला चालवितात.घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुटुंबाला हातभार लागावा म्हणून सुचिता खासगी नोकरीच्या शोधात होती.एका ठिकाणी तिला संधीही आली होती.मात्र, सासरच्यांचा विरोध होता.घटनेच्या दिवशी पती निखिल,भासरा शैलेश व सासू शोभा यांनी सुचिताशी भांडण करीत,मारहाण केली.यातून हताश झालेल्या सुचिताने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
कारगाव व सालेशहरी-सालेभट्टी (पुनर्वसन) ही दोन्ही गावे अगदी लागून आहेत.ओळखीतून सुचिता व निखिल यांच्यात प्रेमाचा धागा जुळला आणि दोन वर्षापूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला.दोघांच्या वेलीवर श्रेयांशी नावाचे फूल उमलले.सुचिताच्या आत्महत्येमुळे मातृछत्र हरविलेली श्रेयांशी अवघ्या नऊ महिन्यांची आहे.सुचिताने आयटीआयचे शिक्षण घेतले असून विवाहानंतरही तिचे शिक्षण सुरु होते. सध्या ती एमए करीत होती,तर निखिल हा दहावा वर्ग नापास आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!