Thursday, April 16, 2026
Homeगोंदियारस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळून आले अस्वल...

रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळून आले अस्वल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-अर्जुनी मोरगाव ते साकोली मार्गावर निमगाव परिसरात आज,११ ऑगस्टला सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला अस्वल मृतावस्थेत पडून असल्याचे नागरिकांना दिसून आले.याची माहिती निमगाव येथील नागरिकांनी अर्जुनी मोरगाव वनविभागाला दिली.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सचिन कटरे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पाहणी केली.सदर अस्वलाचे वय अंदाजे ५ वर्षे असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पहाटे  मृत्यु झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत अस्वलाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी एस.जी.अवगान यांच्या समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.समीर शेंदरे यांनी उत्तरीय तपासणी केली.यावेळी मृत अस्वलाचे नमुने पुढील तपासाकरीता घेण्यात आले आहेत.शवविच्छेदन झाल्यावर अस्वलावर अर्जुनी मोरगाव येथील वन आगारात अंत्यसंस्कार करण्यात आले.
.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!