Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता केसांवर फुगे नव्हे तर किलोभर केसांना एक ग्रॅम सोन्याचा भाव..

आता केसांवर फुगे नव्हे तर किलोभर केसांना एक ग्रॅम सोन्याचा भाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-लांबसडक,काळेभोर व दाट केस हा महिलांचा अनमोल दागिनाच.सौंदर्य खुलवणारा, चार चांद लावणारा म्हणून केसांकडे बघून प्रियकर दिवाने होत असतात.जटा सावरत समोर येणाऱ्या ललनेची छबी व अनेक गीतेही गाजली आहेत.सध्या ‘फुगे घ्या फुगे, केसावर फुगे’ हे लोकगीत डीजेवर धुमाकूळ घालत आहे.पण आता या केसांना सोन्याचा भाव देखील मिळत आहे.किलोभर केसांच्या बदल्यात चक्क ग्रॅमभर सोने देखील विकत घेता येऊ शकते.आधी फुगे,आणि भांडे घेता येत होते.मात्र,आता चक्क सोन्याचा भाव मिळत असल्याने गळलेले केस सांभाळून ठेवण्याचा प्रकार वाढला आहे.५० ग्रॅम केसांना २०० रुपयांहून अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे महिलांनी डोके विचरताना गळालेल्या केसांचा पुंजका फेकणे बंद केले आहे.आता प्रत्येक पुंजका तन्मयतेने साठवून ठेवला जातो आहे.पूर्वी गल्लीबोळातून केसावर फुगे खरेदी केले जायचे.मग फुग्यांची जागा भांड्यांनी घेतली.आता मात्र केस वजनाने खरेदी केले जात आहेत.दीड वर्षांपूर्वी २ हजार रुपये किलोने विकले जाणारे केस सध्या दुप्पट भावाने खरेदी केले जात आहे. केसांना कमीअधिक ४ ते ५ हजार रुपये किलो भाव असल्याने महिला केस सांभाळून ठेवत आहेत. विदेशात भारतीय केसांना मोठी मागणी आहे.त्यापासून केसांचे विग,हेअर पीसेस बनविले जातात. व्याधीग्रस्त महिलांच्या डोक्यावरून केस निघून जातात.त्यांना हेच विग वापरावे लागतात.या व्यवसायात आता तेजी आली आहे.छोटे-मोठे व्यापारी गल्लीबोळात फिरून भांड्यांवर केस विकणाऱ्यांकडून केस जमा करतात.काळ्या,निरोगी केसांना जास्त भाव मिळतो आहे.विक्रेत्यांकडे केसांचे काळे,लाल,सोनेरी, सरळ,कुरळे केस असेही प्रकार असतात.भारतातून युरोप,आफ्रिका,कॅनडा आदी देशांत केसांची निर्यात होत असते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!