Sunday, June 21, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्रीच्या बत्तीसाव्या सत्रातील कविता स्पर्धेत राजेंद्र सोनटक्के विजयी...

नाट्यश्रीच्या बत्तीसाव्या सत्रातील कविता स्पर्धेत राजेंद्र सोनटक्के विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे बत्तीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३१ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी राजेंद्र यादवराव सोनटक्के यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “आई” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
राजेंद्र यादवराव सोनटक्के हे गडचिरोली येथील रहिवासी असून ज्येष्ठ कवी आहेत.त्यांचा ‘काव्यसरीता’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे.‌’ब्रम्हाकुमारीज’ या मासिकातून त्यांच्या कविता नियमितपणे प्रकाशित होत असतात.हिंदी व मराठीतून तसेच आध्यात्मिक विषयावरील जवळपास दिडशेच्या वर कवितांचे त्यांनी लेखन केलेले  आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
बत्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे, वंदना सोरते,सौ.प्रेमिला अलोने,तुळशीराम उंदीरवाडे, लता शेंद्रे,रेखा दिक्षित,सुभाष धाराशिवकर,सुनिता तागवान,मिलींद खोब्रागडे,मुरलीधर खोटेले,पी.डी. काटकर,संगीता ठलाल,प्रिती ईश्वर चहांदे,गणेश रामदास निकम,मंदाकिनी चरडे,रोहिणी पराडकर,  किशोर बोरकुटे,सोनाली रायपुरे,विलास टिकले,राजेंद्र यादवराव सोनटक्के,वसंत चापले,पुनाजी कोटरंगे,  उकंडराव नारायण राऊत,शैला चिमड्यालवार, राजरत्न पेटकर,खुशाल म्हशाखेत्री,रंजना चुधरी,केवळराम बगमारे, कु.भावना रामटेके,ज्योत्स्ना बन्सोड,सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!