Tuesday, July 14, 2026
Homeनागपूररस्ता कामाबाबत दिशाभूल करणारी माहिती; महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालकांना अवमान नोटीस..

रस्ता कामाबाबत दिशाभूल करणारी माहिती; महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालकांना अवमान नोटीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर-काटोल रोड चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण व्हावे,यासाठी दिनेश ठाकरे व सुमित बाबुटा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली.दरम्यान,याचिकाकर्त्यांचे वकील ॲड.महेश धात्रक यांनी मांडलेले मुद्दे व तीन सदस्यीय समितीच्या अहवालामधून महामार्ग प्राधिकरण दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले.प्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवमान कारवाईची कारणे दाखवा नोटीस बजावून येत्या १६ जानेवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.त्यासोबतच महामार्ग प्राधिकरणचे जुने व नवीन प्रतिज्ञापत्र आणि विशेष समितीच्या अहवालाचा अभ्यास करून प्राधिकरणने कोणकोणती खोटी माहिती दिली,याचा तुलनात्मक तक्ता आज,बुधवार २४ डिसेंबरला सादर करा,असे निर्देशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले.महत्वाचे म्हणजे,२६ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने या रोडवर रेडियम बोर्ड व वळणमार्गाचे फलक लावण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर प्राधिकरणने एप्रिलमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे सांगितले होते; परंतु समितीच्या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आवश्यक सूचना फलक नसल्याचे दिसून आले.तसेच, नागपूर-फेटरी रोडचे कामही अपूर्ण असल्याचे आढळून आले.प्राधिकरणने ही दोन्ही कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल,अशी ग्वाही नवीन प्रतिज्ञापत्राद्वारे दिली; परंतु त्यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने प्राधिकरणद्वारे विविध मुद्द्यांवर केली गेलेली दिशाभूल लक्षात घेता सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!