Monday, August 31, 2026
Homeगोंदियाअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या ३५ वर्षीय तरुणास चार वर्षाचा सश्रम कारावास..

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या ३५ वर्षीय तरुणास चार वर्षाचा सश्रम कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-मैत्रिणीकडे नोटबुक परत करण्यासाठी पायी निघालेल्या अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणास चांगलेच महागात पडले आहे.प्रकरणी मुलींनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आणि तब्बल एक वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीनंतर आरोपी तरुणास जिल्हा विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.एन.गौतम यांनी काल मंगळवारी चार वर्षाचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे.महेश भोलाराम मुर्ख वय ३५ वर्षे,रा.सुभाष वॉर्ड,तिरोडा, जि.गोंदिया असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी नाव आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील तीन अल्पवयीन मुली ८ जुलै २०२४ रोजी मैत्रिणीच्या घरी गणिताची नोटबुक परत करण्यासाठी नाग मंदिरापासून सपना फॅशन दुकानाजवळ पायी जात असतांना दुकानासमोर आरोपी महेश मुर्ख याने पीडित अल्पवयीन मुलीकडे पाहून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिघींच्या मधून चालत जाऊन छेड काढली.यामुळे मुली घाबरल्या आणि पोलिसांत तक्रार नोंदवली.त्यानुसार, तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१), ७८,सहकलम ८,१२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी केला होता.या प्रकरणावर काल मंगळवारी न्यायालयात सुनावणी पार पडली.विशेष सत्र न्यायालयासमोर विशेष सरकारी वकील पारधी यांनी आरोपी विरोधात सात साक्षीदार तपासले.तर पीडितेची बाजू विशेष सरकारी वकील कृष्णा तिवारी यांनी मांडून आरोपीने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचे कश्या प्रकारे उल्लंघन केल्याचा पाढा वाचला.प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.एन.गौतम यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ८ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला, तसेच दंड न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला.दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास सुनावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!