Tuesday, July 7, 2026
Homeमुंबईमोठी बातमी,स्पेशल '२६' चित्रपटाची पुनरावृत्ती; बनावट ईडी अधिकारी बनून ३ किलो सोने,२५...

मोठी बातमी,स्पेशल ‘२६’ चित्रपटाची पुनरावृत्ती; बनावट ईडी अधिकारी बनून ३ किलो सोने,२५ लाख रुपयांची केली लुटमार…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई:- मुंबईत स्पेशल ‘२६’ चित्रपटाची पुनरावृत्ती घडल्याचे समोर आले आहे.बनावट ईडी अधिकारी म्हणून आलेल्या भामट्यांनी झवेरी बाजारमधून तब्बल ३ किलो सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये लुटल्याने खळबळ उडाली आहे.आपण साऱ्यांनी अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल ‘२६’ चित्रपट पाहिलाच असेल.हा चित्रपही एका खऱ्या घटनेवर बेतलेला आहे.या चित्रपटाची पुनरावृत्ती मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.चक्क बनावट ईडी अधिकारी म्हणून आलेल्या भामट्यांनी झवेरी बाजारमध्ये जाऊन जोरदार लूटमार केली आहे.

ईडीचे अधिकारी म्हणून चार भामटे झवेरी बाजारात दाखल झाले.त्यांनी एका सराफा व्यावसायिकाच्या ऑफिसवर छापा टाकला.त्यांनी तिथे असलेल्या कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आणि या ठिकाणाहून तब्बल तीन किलो सोन्याचे दागिने लंपास केले. सोबतच पंचवीस लाखांची रोकडही उकळली.भामट्यांनी लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत जवळपास १ कोटी ७० लाख रुपये असल्याचे समजते.शिवाय पंचवीस लाखांची रोकड;अशी भामट्यांनी दोन कोटींच्यावर माया लंपास केली आहे. या प्रकरणी चौघाविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याचे समजते.सध्या सगळीकडे ईडीचा बोलबाला आहे.नेमके हेच हेरून चोरट्यांनी हा डल्ला साधला आहे.या लुटीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

तारेवर ओले कपडे वाळवायला गेली अन् क्षणात जीव गमावून बसली..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-घरातील कपडे धुवून घराशेजारी असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला असलेल्या अर्तींग तारेवर ओले कपडे वाळवतांना विद्युतचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय महिलेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!