- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज,बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास पुणे जिल्ह्याच्या बारामती विमानतळावर विमान लँडिंग दरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू झाला.अजित पवार यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याने अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे.विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक,सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.अजित पवार एका खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला गेले होते. लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले.नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने(डीजीसीए)या अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते.अजित पवार निवडणुकीसाठीच्या चार सभांना उपस्थित राहण्यासाठी बारामतीला जात होते.पुण्याच्या बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले.विमान सरळ शेत शिवारात जाऊन पडल्याने मोठी आग लागली.स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले,मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही.या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक ६ वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ‘सकाळी ७ वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री’ अशी त्यांची शिस्तबद्ध ओळख होती.अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावला आहे.बारामतीसह संपूर्ण पुण्यात शांतता पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि मुले पार्थ व जय असा परिवार आहे.अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे,पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहेत. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दिल्लीला गेले होते.तात्काळ त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहे.अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला.राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रशासकीय पकडीसाठी ओळखले जात होते. त्यांनी १९८२ मध्ये सहकारी कारखान्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले, परंतु काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला.१९९१ पासून ते सलग बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते.त्यांनी जलसंपदा, अर्थ,नियोजन आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ इतर व्यक्ती (१ पीएसओ आणि १ सेवक) व २ चालक दलाच्या सदस्यांसह (पायलट इन कमांड + फर्स्ट ऑफिसर)विमानात होते. विमानात असलेल्यांपैकी कोणीही या अपघातातून बचावलेले नाही.चालक दलासह ५ जण विमानात होते.

- Advertisement -

