- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलिंचा बीमोड करण्यासाठी सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानांतर्गत काल बुधवारच्या रात्री छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामेटा परिसरात नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार नारायणपूर येथील डीआरजी आणि कोंडागाव येथील एसटीएफ जवानांना नक्षलवादी कारवाईसाठी पाठवण्यात आले असता नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.गोळीबार सुरू होताच जवानांनीही जश्यास-तसे चोख प्रत्युत्तर दिले.रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झालेत.त्यानुसार जवानांनी आज,गुरुवारी सकाळच्या सुमारास परिसरात शोधमोहीम राबवली असता घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह तसेच ३१५ बोअरच्या रायफल सह इतर शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.परिसरात अजूनही आज सकाळपासून शोधमोहीम सुरूच आहे.
- Advertisement -

