Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरनवरी मंडपात जाणार तितक्यात धाडकन पोलिसांची एंट्री..!

नवरी मंडपात जाणार तितक्यात धाडकन पोलिसांची एंट्री..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.असे असतांनाही नागपूरच्या कामठी परिसरात वारंवार बालविवाह करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.अश्याच प्रकारे काल,बुधवार २५ जून रोजी नागपूरच्या कामठी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा पार पडणार होता.नवरी सजली होती. पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली.मंडपात सनई-चौघडा वाजू लागले.नवरी लग्न मंडपात जाणार,तितक्यात धाडकन बाल संरक्षण विभागाच्या पथकासह पोलिसांची एंट्री झाली.एंट्री होताच मंडपात सगळीकडे पळापळ सुरू झाली आणि बाल विवाह होता-होता बचावला.कामठी परिसरातील दोन महिन्यांतील चौथी घटना असल्याने समजावूनही काहीजण ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. कामठी परिसरात बाल विवाह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कामठीचे पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाल्यानंतर,त्यांनी तातडीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर,महिला व बालविकास अधिकारी रणजीत कुरे यांनी कारवाईसाठी संरक्षण अधिकारी साधना हटवार, दीप्ती मोटघरे,रुक्मिणी जंगलवार आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैष्णती बावणे यांचे पथक स्थापन केले.पथकाने लागलीच विवाहस्थळी धडक देत बालविवाह रोखला. बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच मुलींना होणारा त्रास व इतर बाबी उपस्थितांना समजावून सांगत १७ वर्षीय मुलीला बालसुधारगृहात नेण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!