Friday, September 11, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी.. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून... - देसाईगंज तालुक्यातील...

मोठी बातमी.. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून… – देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेले अन् पतीने पत्नीच्या डोक्यावर खलबत्त्याने वार करुन खून केला व नंतर शेजारील विहिरीत टाकले असल्याची घटना आज, बुधवार दिनांक-१६ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव या गावी घडली.स्नेहा लोकेश बाळबुद्धे वय ३२ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती लोकेश गुणाजी बाळबुद्धे वय ३५  वर्षे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,लोकेश बाळबुद्धे
हा नेहमी पत्नी स्नेहा च्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा.यात वडिलांनी हस्तक्षेत केल्यास वडिलांनाही दमदाटी करायचा आज सकाळी  ११ वाजताच्या सुमारास लोकेश व स्नेहा यांच्यात संशयावरून कडाक्याचे भांडण झाले.त्यावेळी लोकेशचे वडील गुणाजी बाळबुद्धे हे स्वतःची सायकल घेऊन दुरुस्तीसाठी गावात गेले होते.तर लोकेशची आई तिचे माहेर कोरेगावचे असल्याने माहेरी घरी गेली होती.लहान मुलगा घरीच दुसऱ्या खोलीत पलंगावर झोपेत होता.मोठा मुलगा शाळेत गेला होता.दोघा पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेले व लोकेशने घरातील खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यावर एक ते दोनदा वार केला.डोक्यावर वार केल्याने स्नेहा गंभीर जखमी होऊन खाली कोसळली. स्नेहाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्या स्थितीत स्नेहाला मृत पावल्याचे समजतच लोकेशने तिला उचलून घराबाहेरील चौकातील विहिरीत नेऊन टाकले व स्वतः देसाईगंज पोलिसांसमोर जाऊन पत्नीला मारल्याची कबुली देऊन आत्मसमर्पण केले.देसाईगंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून प्रेत  विहिरी बाहेर काढून पंचनामा करून देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
लोकेशला दारूचे व्यसन होते.लोकेश बाळबुद्धे व त्याची पत्नी स्नेहा, लोकेशचे आई-वडील संयुक्त कुटुंबाने राहत होते. लोकेशला दोन मुले असून त्यातील मोठा मुलगा सहा वर्षाचा असून पहिल्या वर्गात शिकत आहे.तर लहान मुलगा तीन वर्षाचा असून तो अंगणवाडीत जात आहे. आईचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुलांवरील छत्रछाया हरपल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर,पोलीस उपनिरीक्षक माने,पोलीस जमादार गेडाम हे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!