Monday, September 14, 2026
Homeभंडारामुलींचे शिक्षण व अन्य खर्च भागविण्याच्या विवंचनेत गळफास घेत संपवली जीवनयात्रा..

मुलींचे शिक्षण व अन्य खर्च भागविण्याच्या विवंचनेत गळफास घेत संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सततची नापिकी,त्यातच कर्जाचे डोंगर, मुलींचे शिक्षण व अन्य खर्च भागविणे कठीण झाल्याने एकदाची कटकट संपवून टाकत भंडारा जिल्ह्याच्या
साकोली तालुक्यातील विर्शी येथील नोगेश शालिकराम मांढरे वय ४७ वर्षे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारी उघडकीस आली.नोगेश मांढरे यांची विर्शी शिवारात पावणेदोन एकर शेती आहे.आधीच अल्पभूधारक व त्यात आलेल्या नापिकीमुळे ते त्रस्त झाले होते.याशिवाय घराचे बांधकाम सुरू असल्याने ते मानसिक तणावात होते. मुलींचे शिक्षण व अन्य खर्च कसा भागवावा,या  विवंचनेत होते.त्यांच्यावर विविध सेवा सहकारी संस्थेचे कर्ज आहे.नापिकी आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून नोगेश यांनी शेतातील मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
शेतकरी नोगेश काल बुधवारी सकाळी शेतात गेले होते.त्यांची आई व मुलगी शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली.त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी,चार मुली व मोठा आप्त परिवार आहे.शासनाने मांढरे कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मांढरे यांची मोठी मुलगी मलगी पदवीधर झाली असून अन्य बहिणी शिक्षण घेत आहेत.परिवारात नोगेश हेच एकमेव कमावते होते.शेतीच्या भरोशावरच त्यांचा प्रपंच सुरू होता. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वी घरकुलाच्या स्लॅबचे काम झाले होते.या घरकुलासाठी निधी अपुरा असल्याने ते विवंचनेत होते.त्यामुळेच त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!