- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच काल शनिवार पासून विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले असून आज रविवारी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उर्वरित आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.अशातच आज,रविवार दिनांक-८ डिसेंबरला गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांनी संविधानाचे पुस्तक हातात घेत विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला पार पडून
कुठलीही सत्ता व पद नसतांना लोकसेवेचा वसा जपणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम यांना जनतेंनी पसंती दिली व आरमोरी विधानसभा मतदारसंघातून मसराम यांना ६ हजार २१० मतांनी विजयी केले.रामदास मसराम यांना ९८,५०९ तर विरोधी महायुतीचे दोनदा आमदार राहिलेले भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे यांना ९२,२९९ मते मिळाली होती.एकूण चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कृष्णा गजबे यांचे मताधिक्य मागील निवडणुकीपेक्षा यावेळी कमी झाल्याचे दिसून आले.
आमदार रामदास मसराम यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतांना सर्वप्रथम रयतेचे राजे,थोर महात्मे,थोर संत,क्रांतिकारी,भारतीय संविधानाचे शिल्पकार यांना वंदन करून शपथ ग्रहण केली.
मसराम यांनी घेतलेली विधानसभा सदस्यत्वाची शपथ👇
मी,रामदास मानकुबाई मळूजी मसराम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की,कायद्याद्वारे स्थापित अशा भारतीय संविधानाबद्दल श्रध्दा व निष्ठा राखीन; भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन.
- Advertisement -

