Saturday, October 10, 2026
Homeदेसाईगंजमाहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या ४० वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या मंडळाने यंदा दिव्य ज्योत आणण्याचा संकल्प केला आहे.या पवित्र कार्यासाठी चोप येथील शुभम नागपूरकर,भाऊराव पालांदुरकर, विनोद डोंगरवार आणि गोविंद बनपूरकर हे भक्त माहूरगडच्या दिशेने रवाना झाले.यावेळी शिवम नागपूरकर,विश्वा बावणे,निलेश राऊत,अंगराज महाराज, तिलक गायकवाड,कुंदन बावणे,तुशांत उईके आणि सुनील गेडाम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी,सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनी रवाना झालेल्या भक्तांना शुभेच्छा दिल्या.नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेले श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत शक्तिपीठ मानले जाते.
  • उद्याला देसाईगंज आणि चोप येथे दिव्य ज्योतीचे होणार भव्य स्वागत👇
माहूरगड येथून आणण्यात येणारी दिव्य ज्योत उद्या रविवारी सकाळी ८ वाजता देसाईगंज येथे पोहोचणार आहे.हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ,अरुण राजगिरे यांच्या घराशेजारी दिव्य ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी १० वाजता चोप येथे दिव्य ज्योतीचे भव्य स्वागत करून गावातून रॅली काढण्यात येणार आहे.दिव्य ज्योतीच्या आगमनाची ग्रामस्थ आणि भाविकांना उत्सुकता असून,या धार्मिक उपक्रमामुळे गावातील नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक वाढणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून शालेय विद्यार्थ्याने घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-क्षुल्लकशा कारणावरून एका ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरालगत असलेल्या बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथील एका...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!