Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरभेसळ खाद्यतेल विक्री करणाऱ्यांना दणका; अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई.....

भेसळ खाद्यतेल विक्री करणाऱ्यांना दणका; अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई.. – टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सणासुदीच्या काळात तेल,मिठाई,मसाले यांची मागणी वाढते.याचाच फायदा घेऊन काही व्यापारी निकृष्ट दर्जाचे किंवा आरोग्यास घातक पदार्थ विक्रीस ठेवतात.त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अशा भेसळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला असून नागपूरच्या इतवारी व मस्कासाथ परिसरातील खाद्यतेल विक्रेत्यांवर धडक कारवाई करत तब्बल १० लाखांहून अधिक किंमतीचा भेसळयुक्त तेलसाठा जप्त केला आहे. तसेच गोंदियातील शिव ऑइल मिलमध्ये तब्बल ३ हजार किलो भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे.या सर्व कारवाईमुळे शहरातील तेल व्यापाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.
दिवाळी जवळ आली की गोडधोड,तळीव पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढतात अन् त्याचवेळी भेसळखोरही डोके वर काढतात.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन नफाखोरांचे खिसे भरले जातात.अश्यांना नागरिकांच्या आरोग्याशी कसलेही देणे-घेणे नसते. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)विभागाने भेसळखोरांवर आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलत दणका देणे सुरू केले आहे.अश्याच प्रकारे नागपूरच्या इतवारीतील राज ऑइल स्टोअर्स येथे जुन्या डब्यांमध्ये तेल रिपॅक करून ‘मिलन’ या नावाखाली विक्री सुरू होती.त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून ४०० टिन (प्रत्येकी १५ किलो)इतक्या साठ्याचा सुमारे आठ लाखांचा माल जप्त करण्यात आला. याशिवाय,नेहरू पुतळा,इतवारी येथील जेठानंद कंपनीवर कारवाई करून ‘ओम’ ब्रँडचे ८०० टिन रिसायकल केलेले संशयित तेल जप्त केले.तसेच प्रयोगशाळा नसतांनाही रिफाइंड सोयाबीन तेल विकणाऱ्या दुकानांवरही धाडी टाकून ८२४ लिटर संशयित तेल(१.२४ लाख रुपये)जप्त केले आहे.
  • संपर्क साधण्याचे आवाहन👇
भेसळखोरांना थारा देऊ नका.कोणत्याही दुकानात संशयास्पद तेल,मिठाई किंवा खाद्यपदार्थ आढळल्यास त्वरित तक्रार करा.यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांक- १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!