- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-२० वर्षीय तरुणीचे गावातीलच एका युवकासोबत सूत जुळले होते.मात्र,तरुण हा दुसऱ्या समाजातील असल्याने त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध होता.त्यामुळे दोघेही पळून गेले होते.काही दिवसांपूर्वी तरुण व तरुणी गावात परत आले होते.दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर तरुणी वडिलांच्या घरी परतली.कुटुंबीयानी तिच्यासाठी स्थळ बघितले होते. काल गुरुवारी तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. मात्र,अज्ञाताने तिचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.सदरची घटना गोंदिया तालुक्यातील बोंडराणी गाव शिवारात उघडकीस आली असून आचल प्रकाश कोबळे वय २० वर्षे,रा.बोंडराणी, ता.जि.गोंदि या असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.
आचल वडिलांच्या घरी परतल्यानंतर तिच्या विवाहासाठी कुटुंबीयांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार काल गुरुवारी तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते.अश्यातच गुरुवारच्या सकाळी घरा शेजारी राहणाऱ्या एका महिलेला आचल गाव शिवारातील परिसरात बेशुद्धावस्थेत दिसून आली.लागलीच महिलेने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली.कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून बघितले असता आचलच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे घाव दिसून आले.यानंतर कुटुंबीयांनी आचलला तिरोडा येथील रुग्णालयात दाखल केले.तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.आचलच्या भावाने पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून आचलचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. हत्येप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

