Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ..

देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-कौशल्य,रोजगार,उद्योजक्ता व नाविन्यता विभाग,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून देसाईगंज इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांकरिता अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे शुभारंभ बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आला.प्रसंगी देसाईगंज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन,विश्वकर्मा व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा लाभार्थी कृष्णकुमार हिरालाल दुफारे (कारपेंटर)यांच्या हस्ते अल्पकालीन अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माया एस.जाधव तसेच आफताब आलम खान अध्यक्ष आय.एम.सी.नारायण वैद्य सदस्य आय.एम.सी.गोपाल उईके सदस्य आयएमसी,सुशील शिवहरे सदस्य आयएमसी,गटनिदेशक ए.व्हि.तिजारे गटनिदेशक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती.सदरचे कार्यक्रम प्रा.एस.एस.चौधरी तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून पार पाडण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा सहारे रासेयो स्वयंसेविका,प्रास्ताविक सी.एम गरमळे रासेयो, कार्यक्रमाधिकारी व आभार प्रदर्शन व्ही.वाय.नागमोती सहसमन्वयक यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील निदेशक,कर्मचारीवृंद तथा प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!