Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजभाजपाचे गडचिरोली जिल्हा सचिव सचिन वानखेडे यांच्या वाढदिवस दिनी रुग्णांना फळे वाटप..

भाजपाचे गडचिरोली जिल्हा सचिव सचिन वानखेडे यांच्या वाढदिवस दिनी रुग्णांना फळे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली जिल्हा सचिव सचिन वानखेडे यांचा  वाढदिवस देसाईगंज येथे विविध सामाजिक कार्य करून पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वानखेडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सचिन वानखेडे हे शांत,संयमी,मृदभाषी,मनमिळावू,गोर- गरिबांसाठी झटणारे नेते असून राजकीय क्षेत्रात दांडगा अनुभव असणारे युवा नेते आहेत.सचिन वानखेडे हे वर्षभरात लोकोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासित असतात. वाढदवसानिमित्त देसाईगंज ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत रुग्णांना फळे,बिस्कीट,दूध पाकिटे वाटप करण्यात आले.
वाढदिवस दिनी उपस्थित भाजपाचे देसाईगंज शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन खरकाटे,
कुलदीप आमले शहर महामंत्री भाजपा,हेमंत गजघाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष शहर भाजपा,बादल राहाटे बूथ प्रमुख माता वार्ड भाजपा,संगम शेंडे बूथ प्रमुख, भाजपा सदस्य पवन तुपट,आदित्य राहाटे,सुभाष लिंगायत, वासुदेव मेश्राम,प्रणय चाहांदे,प्रथम राहाटे,साहिल मेश्राम,गजानन मारबते,अमन रामटेके,संदिप मारबते, तसेच ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील कर्मचारी व बहुसंख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.कर्मचाऱ्यांनी कार्याची प्रशंसा करीत,रुग्णांनी सचिन वानखेडे यांचे आभार व्यक्त करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!