Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीभन्ते भगीरथच्या घरा शेजारी लाखो रुपयांची अवैध रेती व सागवणी पाट्या जप्त….-घोट...

भन्ते भगीरथच्या घरा शेजारी लाखो रुपयांची अवैध रेती व सागवणी पाट्या जप्त….-घोट वनविभागाची कारवाई…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील कोठरी जंगलात अवैध घरकुल बांधकाम करून वास्तव्यास राहणारे भन्ते भगीरथ यांच्या घरा शेजारी लाखो रुपयांची रेती,सागवणी पाट्या व सेंट्रीगचे फाटे असल्याची गुपित माहिती वनविभाग घोटचे वन परिक्षेत्र अधिकारी वाडीघरे यांना मिळताच त्यांनी आपल्या फौजफाट्या सहीत जवळपास १५ कर्मचारी कोठरी जंगल परिसरात पोहचले व घोट वनविभाग उद्याणा समोर भन्ते भगीरथचे अवैध घरकुल बांधकाम असून त्या घरा शेजारी मोठ्या सिताफीने भन्तेनी अंदर १० फुट खोल अंडर ग्राउंड रुम तयार केली होती.त्यातील तपासणी वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.तपासणी करताच सात सागवणी पाट्या सापडल्या व त्याच जंगलातील सागवणी झाडे कापून त्यांचा पाट्या तयार करून ठेवल्या असावा असा अंदाज वर्तविण्यात आला होता; असे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी सांगीतले.शिताफीने,घोट वनविभागाचे कर्मचारी यांनी सदर जागेची झडती घेतली परंतू फक्त पाच ते सहा सागवणी पाट्या सापडल्या.तर जवळच लागुन जवपास शेकडो ब्रास रेती सुध्जदा जप्त केली.सदर अवैध रेतीचा साठा कुठून आलाय? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे कळते.

प्राप्त माहितीनुसार,वनविभागाच्या वतीने कार्यवाही होणार असल्याचे बघून भन्ते भगीरथ,प्रवेश बांबोळे व भन्ते त्रिरथ वनखी हे तिघेही वनविभागाची गाडी दिसताच दुम दबाके जंगलात पळाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.वन परिक्षेत्र अधिकारी वाडीघरे सदर जप्त केलेल्या साहित्यांचा पंचनामा करून भगीरथच्या नावाने पकड वॉरान्ट सोडणार असल्याचे माहिती वाडीघरे यांनी दिली.घोट वन क्षेत्रातील हि पहिलीच मोठी कारवाई असून रेती तस्कर व झाडे कटाई करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!