Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरीच्या नान्होरी ग्रामपंचायतीतर्फे अवैध व्यवसायांवर आळा; अन्यथा कारवाई.. - गावकऱ्यांनी अवैध धंदे...

ब्रम्हपुरीच्या नान्होरी ग्रामपंचायतीतर्फे अवैध व्यवसायांवर आळा; अन्यथा कारवाई.. – गावकऱ्यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना दिली तंबी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्याच्या नान्होरी ग्रामपंचायतीतर्फे गावकऱ्यांच्या पुढाकाराने सर्वानुमते निर्णय घेत गावातील दारू तसेच इतर अवैध धंद्यांवर
आळा घालण्याकरिता पुरुषांसह महिलांची एक स्वतंत्र समिती गठीत करून तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
गावामध्ये बऱ्याच कालावधीपासून मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे उदयास आली आहेत.मुख्यत्वे अवैध दारू विक्रीने जोर धरून अनेकजण दारूच्या आहारी जाऊन अनेकांची संसारे उघड्यावर पडली आहेत. अनेकदा संबंधित विभागांकडे गाऱ्हाणी मांडूनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन दारूबंदी समिती नुकतीच गठीत करून ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची मागणी केली आहे.समिती गठीत होताच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने अवैध धंदे करणाऱ्यांना पाच दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.सदर गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये,
पुरुष समिती👇
लिलानंद दाजीबा ढोरे अध्यक्ष,दिलीप दामोधर प्रधान उपाध्यक्ष,हेमंत मुर्लीधर राऊत सचिव,लक्ष्मण सोमेश्वर ठाकरे सभासद,प्रशांत बाळकृष्ण सेलोटे सभासद, नितीन अनिल राऊत सभासद,दिलीप रामेश्वर राऊत सभासद,प्रविण जैराम राऊत सभासद,कृष्णा खुशाल तोंडरे सभासद,संदिप मोतीराम बगमारे सभासद,नाजी राघो राऊत सभासद,वीवेक उत्तम राऊत सभासद, राखडे सभासद,लुटे सभासद,ठाकरे इत्यादींचा समावेश आहे.
महिला समिती👇
स्वाती गणेश मिसार अध्यक्ष,माधुरी रामचंद्र गव्हाणे उपाध्यक्ष,सुजाता नरेंद्र मेश्राम सचिव,वैशाली रमेश दिघोरे सभासद,सरिता मारोती ठाकरे सभासद, दामिनी दादाजी दोनाडकर सभासद,प्रिती विजय बुराडे सभासद,अश्विनी अनिल राउत सभासद,
मंजुळाबाई बाजीराव ठाकरे सभासद,इंदुबाई ज्ञानेश्वर राउत सभासद,शुभांगी धनपाल ठाकरे सभासद, सत्यकला महेंद्र घरडे सभासद,गायत्री विलास कोरणकार सभासद,शशिकला प्रदिप बगमारे सभासद,जोत्सना दिलीप भोयर इत्यादी.
समितीचा उद्देश गावात सुरू असलेले अवैध धंद्यांवर आळा घालून गावाला अवैध व्यवसायापासून मुक्त करणे असा आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीत असे निर्णय घेतले गेले तर अवैध व्यवसाय मुक्त गावांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येईल.त्यासाठी धाडस,प्रामाणिक वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.अशा प्रकारच्या निर्णयांची अंमलबजावणी साधण्यासाठी त्या गावातील लोकांनी एकसारखा प्रयत्न केला पाहिजे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!