Wednesday, August 5, 2026
Homeचंद्रपूरबस चालकास अचानक आली भोवळ; २० फूट खोल शेतात बस गेली फरफटत...

बस चालकास अचानक आली भोवळ; २० फूट खोल शेतात बस गेली फरफटत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चिमूर आगाराच्या चिमूर ते नागपूर जाणाऱ्या बसचा बस चालकास अचानक भोवळ आल्याने शहरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामगीता कॉलेजजवळ अपघात झाला.यात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून उर्वरित १६ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी सकाळच्या  सुमारास घडली.यात चालक सुनील कुसनाके व वाहक बंडू उके यांना दुखापत झाली आहे.
राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,सकाळी १०.१५ वाजता चिमूर आगाराची,चिमूर-नागपूर सुपर बस क्र.एमएच ४० सीएम ४४१८ नागपूरकरिता प्रवासी घेऊन निघाली असता चिमूर येथील ग्रामगीता कॉलेज जवळ बस चालकाला भोवळ आल्याने बस सुरक्षा कटडे तोडून एका बाजूला धावू लागली.बसचा एक चाक बाजूच्या नालीत गेल्याने ती उलटली व रस्त्यावरून अंदाजे १५ ते २० फूट खोल शेतात फरफटत गेली.यावेळी बसमध्ये ४६ प्रवासी होते.यातील १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.एका महिलेला नाकाला मार लागल्याने ती गंभीर आहे.सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यांना रवाना करण्यात आले.अपघात स्थळी डेपो व्यवस्थापक रोशन मेहर,वाहतूक नियंत्रक सूरज मून व यंत्र अभियंता अखिल मिर्झा यांनी परिस्थिती सांभाळली. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली.
अपघाताची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले.वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जखमींना बाहेर काढले व पोलिस उपनिरीक्षक दिप्ती मरकाम यांनी जखमी प्रवाश्यांना पोलिस व्हॅन व अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात उपचारकरिता दाखल केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!