- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झालेल्या प्राध्यापक महिलेचे राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने वर्षभरापासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार विवाहित प्राध्यापिकेने दाखल करताच कोंढाळी (ता.काटोल) पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.सदर आरोपी पसार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.प्रवीण पुंजाजी सपकाळ वय ४० वर्षे असे आरोपी जवानाचे नाव असून,तो हिंगणा येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये कार्यरत आहे.३५ वर्षीय पीडित महिला ही दत्तवाडी,वाडी,ता.नागपूर (ग्रामीण) येथे राहते.दोघेही २७ एप्रिल २०२४ रोजी पहिल्यांदा कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टार की पॉइंट रिसॉर्ट गेले होते.या रिसॉर्टमध्ये त्याने पहिल्यांदा तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. वर्षभरापासून त्याने पतीला माहिती देऊन तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला.अत्याचार असह्य झाल्याने तिने कोंढाळी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.तिच्या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी प्रवीण सपकाळच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून,घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.पीडित महिला ही बीई(BE)असून,ती खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.तिची व प्रवीणची ओळख फेसबुकवरून झाली.पुढे या ओळखीचे रूपांतर त्यांच्या मैत्रीत झाले.याच मैत्रीचा फायदा घेत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.तिने वाडी पोलिस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र,सर्वप्रथम घटनास्थळ कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने वाडी पोलिसांनी तिला कोंढाळी ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सूचना केली होती.
- Advertisement -

