Tuesday, August 25, 2026
Homeभंडाराप्रेमसंबंधातून लग्न झालेल्या विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या...- भंडारा जिल्ह्यातील घटना..पतीला...

प्रेमसंबंधातून लग्न झालेल्या विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या…- भंडारा जिल्ह्यातील घटना..पतीला अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-प्रेमसंबंधातून लग्न झालेल्या एका विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.स्नेहा राहुल कावळे रा.आझाद चौक,पवनी असे मृत विवाहितेचे नाव आहे.कावळे दाम्पत्याला एक वर्षाची मुलगी आहे.

मृत स्नेहाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पवनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील स्नेहा हिचे लग्न पवनी येथील राहुल कावळे यांच्यासोबत झाले होते.राहुल हा मद्यपान करून स्नेहाला मारझोड करत असे.तसेच माहेरहून शेतीचा हिस्सा आण, यासाठी तगादा लावत होता.स्नेहाचे वडील जावयाची वारंवार समजूत घालत होते. रविवारी चुलत स्नेहाच्या भावाचे लग्न असल्याने राहुल व स्नेहा मांडव कार्यक्रमानिमित्त येथे आले.यावेळी राहुलने स्नेहाशी भांडण करून मारहाण केली. पतीच्या जाच व मानसिक त्रासामुळे मी एक दिवशी जीव देईन, असेही स्नेहाने यापूर्वी म्हणून दाखवले होते.याच जाचाला कंटाळून स्नेहाने दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले व यातच तिचा मृत्यू झाला. पवनी पोलिसांनी राहुल कावळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.न्यायालयाने राहुलला १३ मार्च पर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!