- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-पैश्यासाठी कोण,कुठल्या थराला जाईल,हे सांगताच येत नाही.पैश्याची हाव लय खतरनाकच म्हणावी लागेल.पण,चोर कितीही चोऱ्या करीत असला तरी तो एक ना एक दिवस सपडतोच.अश्याच प्रकारे नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणाऱ्यांच्या मूल पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.चारजण स्वतःला चंद्रपूर पोलीस भरारी पथकाचे मोठे अधिकारी असल्याचे भासवायचे व रक्कम वसूल करायचे.पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच मुल पोलिसांनी अजय विजय उईके वय ३० वर्षे,रा.गजानन मंदिर रोड,शितला माता मंदिर मागे,चंद्रपूर,संगिता बादल दुबे वय २६ वर्षे,बादल दुर्गाप्रसाद दुबे वय ३५ वर्षे,हे दोघेही रा. रेंगेपार,ता.साकोली,जि.भंडारा या तिघांना अटक करण्यात आली आहे.तर चौथा आरोपी देवेंद्र चरणदास सोनवणे वय ३० वर्षे रा.निलज,ता. साकोली, जि.भंडारा(हल्ली मुक्काम-भिवापूर वार्ड, चंद्रपूर हा सध्या फरार आहे.पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.आरोपींकडून १२ लाख ५० हजाराची एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार,४५ हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन व १५ हजार रुपये रोख रक्कम असा १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या टोळीने डोंगरगावच्या एजाज शेख यांच्या अंडा-आमलेट दुकानात जाऊन ग्राहक दारू पित असल्याचा बनाव करत कारवाईची धमकी दिली व ५ हजार रुपये खंडणी उकळली.या प्रकरणावरून रविवार १३ जुलै २०२५ रोजी मुल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. तत्पूर्वी याच टोळीने ३ जुलै २०२५ रोजी फिर्यादी सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३५ वर्षे रा.चिरोली यांच्या घरी एमएच ३४ सीजे ५८२४ क्रमांकाच्या अर्टीका कारने जाऊन स्वतःला चंद्रपूर पोलीस भरारी पथकाचे अधिकारी असल्याचे भासवले.विनापरवाना दारु साठा असल्याच्या कारणावरून कारवाईची धमकी देत त्यांनी फिर्यादीकडून तडजोडीअंती १० हजार रुपयांची खंडणी वसूल केली.या दोन्ही प्रकरणावरून मुल पोलीस खंडणी वसूल करणाऱ्या टोळीच्या मागावर होते.पोलिसांना टोळीचा सुगावा लागताच तिघांना धरदबोचले.मात्र, यातील एक आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी,पोलीस हवालदार जमीर खान पठाण, पोलीस हवालदार भोजराज मुंडरे,नाईक पोलीस अंमलदार चिमाजी देवकते,पोलीस अंमलदार नरेश कोडापे,पोलीस अंमलदार शंकर बोरसरे,पोलीस अंमलदार संदीप चुधरी यांनी केली.
- Advertisement -

