Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजपीक पंचनामे झाले,याद्याही तयार झाल्या; मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळेना…!-देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची...

पीक पंचनामे झाले,याद्याही तयार झाल्या; मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळेना…!-देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आजही कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- मागील वर्षी ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात कृत्रिमरित्या वैनगंगा नदीला आलेल्या पुराने  शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत धान पिकाची नासाडी झाली.त्यानंतर पंचनामेही झाले; याद्याही तयार झाल्या; परंतु अटी व शर्तीच्या कचाट्यात नऊ महिन्यांचा काळ लोटला असला तरी देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,विर्शि, आमगाव,सावंगी व इतर गावातील पूरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळालेला नाही.

अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीनांही मदतीची हाक दिली; पण आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही.ऑगष्ट,सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टी झाली होती. सततच्या पावसामुळे नदी,नाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून धान पिकासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या बाबीला आता ९ महिन्यांचा कालावधी निघूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे पूर पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आजही कायम आहे.शासन-प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी अनेकांनी केली होती.मात्र,त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.पुरामुळे गर्भावस्थेत असलेले धानाचे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले.जवळपास ७६४.०३ हेक्टर क्षेत्रातील धानाची नासाडी झाली होती.याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टी झाल्याने धरणातील पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आले होते.त्यामुळे मोठा पूर आला. पुरामुळे अनेक गावांतील शेतात पाणी शिरून खरीप हंगामातील धानासह इतर पिकांचे नुकसान झाले. तसेच धानावर गढूळ पाणी व धान पाखर झाल्याने मोठे नुकसान झाले.नुकसान होऊनही भरपाई केव्हा मिळणार? याकडे शेतकरी बांधव टक लावून वाट बघत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!