Thursday, September 24, 2026
Homeसिंदेवाहीनिर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.....

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम 
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure Mid)डीजे (DJ)चा वापर केल्याप्रकरणी आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी सिंदेवाही पोलिसांनी मोठी कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार,मंडळाने शासन आदेशाचे म्हणजेच निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा कारवाई करून डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक ५७०/२६ कलम २२३, ३(५)भारतीय न्याय संहिता सहकलम ३८ (१),१३६,७० महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी डीजे,इतर साहित्य व वाहने मिळून एकूण १५ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल  जप्त केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार,पोलीस अंमलदार संजय जुगनाके,नारायण येगेवार,शुभम उराडे,कमलेश फेंडर, सुनिल बहेरकार, नंदकिशोर तुमराम यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!