- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारी व निवेदने विहित प्रक्रियेनुसार सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून नियमितपणे सुनावणी घेण्यात येते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या तक्रारदारांनी प्रथमतः संबंधित तालुका स्तरावरील लोकशाही दिनात तक्रार सादर केलेली असणे आवश्यक आहे.तालुका स्तरावर तक्रारीचे निराकरण होऊन प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यासच संबंधित तक्रारदारांना जिल्हास्तरावर अर्ज सादर करता येणार आहे.
तक्रार अर्जासोबत तहसिलदारांनी दिलेल्या उत्तराची प्रत तसेच तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत जोडणे बंधनकारक राहणार आहे.लोकशाही दिनात केवळ वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी अथवा निवेदनेच स्वीकारली जाणार आहेत.नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करून लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

