Thursday, August 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात जिल्हानिर्मिती नाहीच..! - एका जिल्हानिर्मितीसाठी...

नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात जिल्हानिर्मिती नाहीच..! – एका जिल्हानिर्मितीसाठी किमान पाच हजार कोटी रुपयांची गरज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात अशी जिल्हानिर्मिती होणार नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.एका जिल्हानिर्मितीसाठी किमान पाच हजार कोटी रुपयांची गरज असते.राज्याची सध्याची आर्थिक चणचण पाहता जिल्हानिर्मिती अशक्य असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.काँग्रेस राजवटीत तत्कालीन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या पाठपुराव्यामुळे ऑगस्ट २०१४ रोजी राज्यात पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर गेल्या १० वर्षांत एकही नवा जिल्हा अस्तित्वात आला नाही.पालघर जिल्हानिर्मितीसाठी त्यावेळी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च आला. इतका खर्च करूनही तेथे प्रशासनाची घडी बसलेली नसून आजही पालघरला ठाणे जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत आहे.अशी प्रक्रियाच सुरू नाही.जिल्हा किंवा तालुकानिर्मिती करायची असल्यास प्रस्ताव तयार करून सविस्तर चर्चा केली जाते.मग मसुदा प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातात.हरकतींचा विचार केल्यानंतरच जिल्हानिर्मितीची अंतिम अधिसूचना जारी होऊन जिल्हानिर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते.सध्या अशी प्रक्रिया सुरू नसल्याने २६ जानेवारी रोजी सरकार नवीन जिल्हानिर्मितीची घोषणा करणार ही अफवाच ठरणार आहे.जिल्हानिर्मितीसाठी किमान १५ कार्यालयांची उभारणी करावी लागते.जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,शिक्षणाधिकारी,दिवाणी न्यायालय, जिल्हा कारागृह,शासकीय रुग्णालय,तहसील आणि त्यांना सहायक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
या कार्यालयांसाठी भूसंपादन,इमारती बांधणे,पाणी, वीज आणि कर्मचारी वेतनावर मोठा खर्च लागतो. वाहन ताफा आणि इंधन खर्चाची तरतूद करावी लागते. भूसंपादनानंतर जमिनीचा मोबदला देण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर भार पडू शकतो.तो झेलण्याची ताकद नसल्याने सरकारने सध्या तरी नवीन जिल्हानिर्मितीच्या विचारात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्य सरकारचा महसूल आणि खर्च यांच्यातील तफावतीला वित्तीय तूट म्हटले जाते.राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या विविध लोकप्रिय घोषणांमुळे राज्याची वित्तीय तूट २ लाख कोटींवर पोहोचली आहे.राज्यावरील कर्ज ८ लाख कोटींच्या घरात पोहोचले आहे.राज्य सरकारला वेतन,निवृत्ती वेतन व विविध कर्जावरील व्याज यांच्यासाठी चालू आर्थिक वर्षात २ लाख ७५ हजार ६१५ कोटींचा खर्चाचा भार वाहावा लागत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!