Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीनवीन कायद्याविषयी जनजागृतीपर दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन..

नवीन कायद्याविषयी जनजागृतीपर दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो,क्षेत्रीय कार्यालय वर्धा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली,जिल्हा प्रशासन गडचिरोली, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय गडचिरोली, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली,जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांच्यातर्फे उद्या मंगळवार ४ मार्च पासून जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे नवीन कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी नव्या भारताचे नवे कायदे,भारतीय न्यायसंहिता २०२३ या विषयावर दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत जनजागृती करण्यासाठी आज सोमवारी जनजागृती वाहनाचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत,तांत्रिक सहाय्यक संजय तिवारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!