Monday, July 13, 2026
Homeभंडाराएकाचा जीव व हल्ला चढवणारी वाघीण दिसताच ट्रॅक्विलायझर गनने बेशुद्ध करण्याचे आदेश..

एकाचा जीव व हल्ला चढवणारी वाघीण दिसताच ट्रॅक्विलायझर गनने बेशुद्ध करण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा व उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत काल रविवारी साकोली-तिरोडा मार्ग रोखून धरला.नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रवेशद्वार असलेल्या शिवनटोला आणि पिटेझरी भागात सकाळी अकरा वाजतापासून नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू साळवे, आशिष बोरकर,लाखनीचे पोलिस निरीक्षक बारसे, पोलिस उपनिरीक्षक निता इवनाते आणि अर्जुन बेडवाल यांच्यासह मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला.जोपर्यंत वाघिणीचा बंदोबस्त करण्यात येत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.पोलिसांनी परिसरातील ग्रामस्थांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला,मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम होते.तर दुसरीकडे,वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला व विशेष रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे.वाघिणीवर नजर ठेवण्यासाठी तात्पुरता टॉवर उभारला जात असून,तिला दिसताच ट्रॅक्विलायझर गनने बेशुद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाघिणीचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याऱ्यांचाही वापर केला जात आहे.विशेष म्हणजे,परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला होता.तर शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी उमरझरी परिसरात ४८ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने
यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.सध्या त्या भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!