Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या गांधी वार्डातील समस्या तात्काळ मार्गी लावा- वंचितचे प्रा.अशोक मेश्राम

देसाईगंजच्या गांधी वार्डातील समस्या तात्काळ मार्गी लावा- वंचितचे प्रा.अशोक मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील गांधी वार्डात समस्यांचा डोंगर उभा असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वार्डात मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था,तुटलेले कलवट तसेच रस्त्यांवर पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने देसाईगंज वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम यांचेसह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते,नाले सफाई,तुटलेले कलवट व इतर समस्या नगर परिषदेने तात्काळ मार्गी लावण्याची मागणी प्रा.अशोक मेश्राम यांनी केली आहे.
 देसाईगंज शहरातील गांधीवार्ड हा सुशिक्षीत तसेच शासकिय नौकरदार बहुल नागरिकांचा भाग म्हणून ओळखला जातो.या भागातील वास्तव्यास असणारे जास्तीत जास्त नागरिक वेळेवर कराचा भरणा तसेच इतर बांधकाम शुल्क भरून नगर परिषदेस सहकार्य करीत असतात.मात्र,याच नागरिकांना नगर परिषदे मार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांपासुन वंचित रहावे लागत आहे.सदरची बाब योग्य नसून रस्त्यांवर पडलेल्या मोठ-मोठ्या भगदाडांमुळे वार्डात अनेकजण अपघात होऊन जखमी झालेत.रस्ते खड्डेमय होऊन त्यात पावसाचे पाणी साचत असते.त्यामुळे देसाईगंज नगर परिषद प्रशासनाने तातडीने समस्यांचे निराकरण करावे,अशी मागणी प्रा.अशोक मेश्राम यांनी केली आहे.गांधी वार्डातील समस्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करतांना नगर परिषदेचे बांधकाम अभियंता सौरभ नंदनवार,नसिम पठान,प्रा.प्रकाश बारसागडे,बंडु सिडाम, तारकेश्वर मैंद,राजरतन मेश्राम यांचेसह शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!