Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार..!

आजपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.या वर्षापासून गणेश उत्सव ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. अश्यातच मागील आठवड्यात मुसळधार पावसाने  जोरदार हजेरी लावत राज्यातील विविध भागात हाहाकार माजवत शेती,घरे व इतर नुकसान करून सोडले होते.त्यातच आता भारतीय हवामान खात्याकडून आजपासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पाण्याच्या कर्दनकाळात सापडणार की काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे.काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असणार आहे.आज,मंगळवार २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोरदार खेळ पाहायला मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!